दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे प्राथमिक शाळा बंद, केजरीवाल सरकारची घोषणा,

नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर २०२२: दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत पोहचली आहे. थंडी जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हवा विषारी बनत चालली आहे. हवामान गुणवत्ता ढासळल्यामुळे केजरीवाल सरकारने दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जोपर्यंत हवामानाची गुणवत्ता सुधारत नाही, तोपर्यंत दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा बंद राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक ४८९ वर गेला होता. दुसरीकडे नोएडा येथे हाच निर्देशांक ५६२ वर गेला आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जीआरएपी-४ श्रेणीचे निर्बंध लागू करण्यात आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील आनंद विहार येथे ४७३ एक्यूआय नोंदवला गेला. याशिवाय आयटीओ येथे ४४४, गाझियाबादमधील इंदिरापुरम येथे ४११ एवढा नोंदवला गेला आहे. यामुळे ८ नोव्हेंबरपर्यत पहिली ते आठवीपर्यतच्या शाळा ऑनलाइन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा