दिल्ली साहित्य संमेलन नगरीचे ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी’ असे नामकरण

दिल्ली १२ डिसेंबर २०२४ : दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे २१/२२/२३ फेब्रुवारी २०२५ या काळात होणाऱ्या, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ‘सरहद पुणे’ आयोजित ९८ व्या ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ परिसरास ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी’ नाव देण्याचे, महामंडळ तसेच सरहद या संयोजक संस्थेने ठरविले असल्याची माहिती, महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे तसेच सरहद संस्थेचे संजय नहार यांनी दिलीय.

तसेच साहित्य संमेलनाला येणाऱ्या रसिकांसाठी पुणे – दिल्ली रेल्वे देण्याबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विनंती केली आहे. त्याबाबत माननीय रेल्वे मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र एका रेल्वेत मर्यादित साहित्य रसिकांना समाविष्ट करणे शक्य नसल्याने या रेल्वेवर अवलंबून न राहता, महाराष्ट्रातील साहित्य रसिकांनी आपापल्या भागातून आपले दिल्लीसाठी आरक्षण करावे म्हणजे ऐनवेळी गडबड होणार नाही, असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.

संमेलनाला येणाऱ्यांची सोय करणे शक्य व्हावे यासाठी आपल्या जवळच्या साहित्य संघात अथवा ऑनलाईन प्रतिनिधी शुल्क भरून १५ जानेवारी २०२५ पुर्वी नोंदणी करावी. काही अडचण आल्यास ८४८४०५५२५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीचे प्रतिनिधी आवेदन पत्र नोंदणी लिंक https://forms.gle/oH6WxDrXuvUTn7fG6

न्युज अनकट प्रतिनीधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा