गोल पोस्ट गुन्हा दिल्ली स्पेशल सेल सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड सचिन बिश्नोईला भारतात आणणार

दिल्ली स्पेशल सेल सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड सचिन बिश्नोईला भारतात आणणार

नवी दिल्ली, ३१ जुलै २०२३ : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर सचिन बिश्नोईला भारतात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल टीम अझरबैजानला रवाना झाली आहे. सचिन बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा पुतण्या आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मुसेवाला यांच्या हत्येनंतर तो फरार झाला होता. सचिन बिश्नोई सिद्धू मुसेवाला हत्येच्या काही दिवसांपूर्वी बनावट पासपोर्टचा वापर करून देशातून पळून गेला होता. सचिन बिश्नोईचे लॉरेन्स बिश्नोईशी कनेक्शन असल्याचे सांगितले जाते. तो स्वत:ला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाचा असल्याचे सांगतो. तो लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला देशाबाहेरून मदत करतो. त्याचे खरे नाव सचिन थापन आहे, परंतु लॉरेन्सशी स्वतःला जोडण्यासाठी तो सचिन बिश्नोई हे नाव देखील वापरतो.

सचिन बिश्नोईचे भारतातील प्रत्यार्पण सुनिश्चित करण्याचे काम, सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) आणि काउंटर इंटेलिजन्स युनिटच्या दोन निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाला सोपवण्यात आले आहे. सचिन बिश्नोई हा सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड मानला जातो. त्याच्या अटकेने आणि प्रत्यार्पणाने खून प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे अपेक्षित आहेत. काही दिवसांपूर्वी सचिन बिश्नोई याला अझरबैजानमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. आता भारतीय सुरक्षा यंत्रणा तिथे गेल्याने त्याला भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे.

प्रसिद्ध रॅप गायक आणि काँग्रेसचे नेते शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मुसेवाला यांची पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात गोळ्या झाडून हत्या केल्यानं पंजाबमध्ये खळबळ उडाली होती. विशेषत: सरकारनं सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्यांची हत्या झाल्यानं, सत्ताधारी आम आदमी पक्षाला टीकेला सामोरं जावं लागत होतं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही विरोधकांनी ऐरणीवर आणला होता.काँग्रेसकडून त्यांनी नुकतीच विधानसभा निवडणूक लढविली होती; त्यामुळं या हत्येनंतर राजकारण उफाळलं होतं. खंडणीसाठी ही हत्या झाल्याचा आरोप मुसेवाला यांच्या वडिलांनी केला होता.याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. अलीकडेच, एनआयएने विक्रमजीत सिंग उर्फ विक्रम ब्रार या लॉरेन्स बिश्नोईच्या प्रमुख सहकारी याला संयुक्त अरब अमिरातीतून भारतात हद्दपार केल्यानंतर अटक केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version