दिल्ली : भरधाव कारने तीन मुलांना चिरडले; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२२ : दिल्लीतील गुलाबीबागमध्ये रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन मुलांना एका भरधाव कारने चिरडले. या अपघातानंतर एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजता घडली. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार फुटपाथवर चढली आणि हा अपघात झाला. गजेंद्र असे या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी या अपघातात जखमी झालेल्या मुलांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे. यातील दोन मुलांची प्रकृती चांगली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

ही पूर्ण घटना रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती कैद झाली आहे. तसेच संबधित चालकाविरोधात भारतीय दंड संहिता कलम २७९ आणि ३३७ अंतर्गत प्राथमिक गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरु करण्यात आली असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा