दिल्ली समोर झुकणार नाही, भाजप सरकार विरोधात शरद पवारांचा हल्लाबोल

दिल्ली, ११ सप्टेंबर २०२२: दिल्ली येथील तालाकटोरा मैदानात आज राष्ट्रवादीचे आठवे अधिवेशन होतं आज या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान शरद पवार यांनी केंद्र सरकार विरोधात निशाणा साधला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचाराने आम्हाला प्रेरणा मिळते, योग्य मार्ग दिसतो तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे. त्या शिकवणीनुसार मी दिल्ली समोर कधी झुकणार नाही, असे बोलत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकार विरोधात लढण्याचा कानमंत्र दिला आहे.

मागील काही वर्षांपासून देशात मोठे बदल होत आहेत. बळीराजा शेतकरी देशाच्या अन्नाची गरज पूर्ण करतो तसेच देशाला शेतकऱ्यांचा अभिमान आहे. आपल्या देशात ५६ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांचा अभिमान आहे. तसेच आत्ताच्या केंद्र सरकार विरोधात रोष पण आहे. तसेच आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रपणे लढणे गरजेचे आहे.

तसेच अपलसंख्यक समाजा बद्दल विरोधात झाले पाहिजे, असे वातावरण निर्माण करत आहेत. तसेच शरद पवार पुढे बोलतात की संसदेत ३ कृषी कायदे १० मिनटात मंजूर केले. पण त्या विषयी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. पण राष्ट्रवादी काँगेस पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या अडचणी साठी मैदानात उतरणार, असे थेट आवाहन शरद पवारांनी मोदींना दिले. यासोबतच, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर महिलांच्या आदराविषयी केलेल्या भाषणावरही भाष्य केलं. एकीकडे सन्मानांच्या गोष्टी करायच्या अन् दुसरीकडे आपल्या गुजरात राज्यात बिलकीस बानो हिच्यावर अत्याचार करणारे, तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करणाऱ्या लोकांची शिक्षा माफ करण्याचं काम गुजरात सरकारने केलं आहे. अशी टीका यावेळी शरद पवारांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा