DC vs SRH IPL, 6 मे 2022: गुरुवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 21 धावांनी पराभव केला. डेव्हिड वॉर्नरची 92 धावांची खेळी आणि रोव्हमन पॉवेलची झंझावाती खेळी यांच्या जोरावर दिल्लीने 207 धावांची मोठी मजल मारली. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघ लक्ष्यापासून खूप मागे राहिला आणि त्यांना केवळ 186 धावा करता आल्या.
या विजयासह दिल्ली कॅपिटल्सचे 10 गुण झाले आहेत. दहा सामन्यांत 5 विजय, 5 पराभवांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचे अजून 4 सामने बाकी आहेत, त्यामुळे जर त्यांनी त्यांचे सर्व सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. त्याचवेळी, सनरायझर्स हैदराबादचा संघ 10 सामन्यांत 5 विजय, 5 पराभवानंतर सहाव्या क्रमांकावर आहे.
सनरायझर्स हैदराबाद डाव – 186/8
निकोलस पूरनने या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. निकोलस पूरनने 34 चेंडूत 6 षटकारांसह 62 धावा केल्या. एके काळी निकोलस पूरन हा सामना स्वबळावर जिंकेल असे वाटत होते, पण अखेरीस त्याने आपली विकेट गमावली आणि त्यामुळे हैदराबादच्या आशा संपल्या.
या सामन्यात पूरनपूर्वी हैदराबादची सुरुवात खराब झाली, अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. राहुल त्रिपाठीलाही केवळ 22 धावा करता आल्या. नंतर एडन मार्करामने 42 धावांची जलद खेळी खेळली, पण तो बाद झाल्यानंतर निकोलस पूरन एकाकी पडला.
पहिली विकेट – अभिषेक शर्मा 7 धावा, 8/1
दुसरी विकेट – केन विल्यमसन 4 धावा, 24/2
तिसरी विकेट – राहुल त्रिपाठी 22 धावा, 37/3
चौथी विकेट – एडन मार्कराम 42 धावा, 97/4
पाचवी विकेट – शशांक सिंग 10 धावा, 134/5
6वी विकेट – शॉन अॅबॉट, 7 धावा, 153/6
सातवी विकेट – निकोलस पूरन, 62 धावा, 165/7
आठवी विकेट – कार्तिक त्यागी, 7 धावा, 181/8
दिल्ली कॅपिटल्स डाव – 207/3
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. ज्येष्ठ खेळाडू डेव्हिड वॉर्नरने 92 धावांची शानदार खेळी करत हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. डेव्हिड वॉर्नरने आपले शतक पूर्ण केले नसेल पण त्याने संघाला 207 धावांपर्यंत नेले.
डेव्हिड वॉर्नरशिवाय दिल्लीच्या रोवमन पॉवेलने वादळ निर्माण केले. रोव्हमन पॉवेलने 35 चेंडूंत 3 चौकार आणि 6 षटकारांसह 67 धावा केल्या. रोवमनने डावाच्या शेवटच्या षटकात 19 धावा केल्या.
पहिली विकेट – मनदीप सिंग 0 धावा, 0/1
दुसरी विकेट – मिचेल मार्श 10 धावा, 37/2
तिसरी विकेट – ऋषभ पंत 26 धावा, 85/3
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग-11: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, शॉन अॅबॉट, कार्तिक त्यागी, उमरान मलिक
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग-11: डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत, ललित यादव, ऋषभ पंत, ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, अॅनरिक नॉर्केआ
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे