नवी दिल्ली : जामिया विद्यापीठात पोलिस आणि विद्यार्थी यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर आता दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या धुमचक्री दरम्यान अटक केलेल्या दहा जणांपैकी एकही विद्यार्थी नसल्याचे महिती दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
याबाबत दिल्लीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त कुमार ज्ञानेश यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
आंदोलक पुर्वतयारी करून आंदोलनात उतरले होते. त्यांच्याकडे भिजलेली ब्लँकेट होती. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडताच त्यावर टाकण्यासाठी त्यांचा वापर आंदोलकांनी केला. आंदोलन शांततेनं होतं तर मग ब्लँकेट भिजवून कसं काय आणलं याचा तपास केला जात आहे. हे नक्कीच उत्स्फुर्तपणे नव्हतं तर सर्वकाही पुर्वनियोजित होतं असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे.