गोल पोस्ट गुन्हा डिलीव्हरी बाॅयने ६६ महिलांवर केले बलात्कार…..

डिलीव्हरी बाॅयने ६६ महिलांवर केले बलात्कार…..

हुगळी, २४ फेब्रुवरी २०२१: भारतात दिवसेंदिवस महिल्यांच्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे.देशातील कुठल्याना कुठल्या कानाकोपर्यात महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना समोर येत आहे. ज्या मुळे देशातील आरजकतेच्या विकृत प्रवृत्तीच्या नरधमांचे पितळ उघडे परत आहे.

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्हातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ज्या मधे केकची डिलीव्हरी करणार्या एका मुलाने एक दोन नाही तर तब्बल ६६ महिलांवर बलात्कार केला आहे. ही घटना समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

विशाल शर्मा असे त्या आरोपी नरधमाचे नाव आहे. विशाल हा केक ऑर्डर केलेल्या महिलांकडून फिडबॅक जाणून घेण्यासाठी त्यांना व्हीडीओ काॅल करत आणि मग त्यांचे आश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत.आणि ब्लॅकमेल केल्यानंतर तो त्यांच्यावर बलात्कार करत होता.

विशाल शर्मा या नरधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आसून तो आता गजाआड आहे.पण विशालच्या या कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.ज्यावर सरकार ही गांभीर्याने लक्ष घालत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे सरकारनेही आता या बाबत कठोर पाऊले उचलणे गरजेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version