बारामती, २७ सप्टेंबर २०२०: मराठी न्युज चॅनल एबीपी माझा वर गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले की, आपल्या देशात चरस, गांजा, भांग ओढणं याला आपल्याकडं गुन्हा मानत नाहीत हा आपल्या संसकृतीचा भाग आहे. अस वक्तव्य केलं. याच्या विरोधात ऍड भार्गव पाटसकर यांनी नार्कोटेस्ट कंट्रोल ब्युरो ( एन बी सी ) यांच्या कडं जावेद अख्तर यांच्यावर योग्य कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.
काल मराठी न्युज चॅनल एबीपी माझा वर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्ती केस संदर्भात बोलताना म्हणाले चरस, गांजा, भांग यांचं सेवन करणं हा काही गुन्हा नाही. मात्र, आपल्याकडं एनडीपीएस कायद्यानुसार गांजा, चरस सेवन करणं कलम २७ नुसार अपराध आहे. त्यांच्या अशा चुकीच्या वक्तव्यामुळं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून त्यांनी एकप्रकारे लोकांना गांजा, चरस घेण्यास प्रवृत्त केलं आहे.
जावेद अख्तर यांच्यावर भारतीय दंड कलम ११६ कलम २७ एन डी पी एन कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करावी अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. आपल्या देशात सेलिब्रिटी विशेषतः सिने कलाकारांची तरुण पिढी अनुकरण करत असल्यानं त्यांच्या अशा वक्तव्यानं समाजात विशेषतः तरुण पिढीमध्ये चुकीचा मेसेज जाऊन याचं अनुकरन होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. तसेच एबीपी माझा चॅनल’नं मुलाखतीतून अख्तर यांचं हे वक्तव्य काढून टाकावं. तसेच एन सी बी यांनी कायदेशिर पर्याय पडताळून अख्तर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बरमतीचे ऍड भार्गव पाटसकर यांनी केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव