गोल पोस्ट महाराष्ट्र शिर्सुफळ येथील रस्ता खुला करण्याची मागणी

शिर्सुफळ येथील रस्ता खुला करण्याची मागणी

बारामती, २९ सप्टेंबर २०२०: उंडवडी कडेपठार बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील पाटीलवस्ती ते कोळीवस्ती या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. दोन दिवसांपूर्वी आजीला घेवुन जाणाऱ्या नातवाची गाडी घसरुन अपघात झाला. सुदैवाने किरकोळ जखमेवर निभावले. यामुळे या मार्गाच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होतो आहे.

येथील पाटील वस्तीपासुन कोळीवस्ती,आटोळे वस्ती, शिर्सुफळ तलाव याकडे जाणारा मार्ग आहे.मात्र दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांच्या वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न रेंगाळला आहे. संबंधित शेतकरी कच्चा रोड वापरण्यात अडचण करीत नाहीत. मात्र रस्ता दुरुस्ती कामाला अडचण करीत असतात.असा आरोप या मार्गाचा नियमित वापर करीत असलेल्या ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत ग्रामपंचायत प्रशासनानेही महसुल प्रसाशनाला निवेदन देवुन कायम रस्ता खुला करुन रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याबाबतची मागणी वारंवार केली आहे.

न्युज अनकट – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version