काठमांडू, २५ जून २०२० : नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या विरोधात पी के दाहाल उर्फ ” प्रचंड ” यांनी संताप व्यक्त करत , पंतप्रधानांच्या ओलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
प्रचंद म्हणाले, पंतप्रधान ऑली हे प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहेत, प्रचंड पुढे म्हणाले की त्यांना पक्षाच्या अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. पंतप्रधान ओली यांनी राजीनामा न दिल्यास पक्षात फूट पाडण्याची धमकीही प्रचंड यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, ओली यांच्याशी पक्षातील ऐक्याबद्दल त्यांना खेद आहे आणि ही त्यांची सर्वात मोठी राजकीय चूक होती. प्रचंड यांना पक्षाच्या दोन माजी पंतप्रधानांचा पाठिंबा आहे. नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष अंतर्गत वादात अडकलेला दिसत आहे.
बंडखोरीची कुजबूज पक्षात ऐकू येत आहेत. पक्षातीलच नेत्यांनी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधान ओली प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहेत, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, असे म्हणणार्या पुष्प कमल दाहाल उर्फ ‘प्रचंड’ हे त्यात आघाडीवर आहेत. प्रचंड हे कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्षही आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी