अभाविप ची वसतिगृह सुरू करणे बाबत मागणी

पुणे, १७ फेब्रुवरी २०२१: कोरोना काळात संपूर्ण भारताने अत्यंत यशस्वी पणे लढा देऊन जगाचे नेतृत्व केले आहे. पण आता परिस्थिती पुर्वरत येत आहे. शासनाने आतापर्यंत भरपूर क्षेत्र उघडले आहेत आणि आता शिक्षण क्षेत्रात ही पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम देखील सुरु करण्यास सूचना दिल्या आहेत. तसेच लवकरच १५ फेब्रुवारीपासून अन्य उर्वरित शिक्षण क्षेत्र देखील खुले होणार आहेत.

एकीकडे शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहेत पण, वसतिगृह आणखीन सुरु झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य गावातून येण्यासाठी, शहरात राहण्यासाठी व भोजनासाठी अमाप खर्च येत आहे. हा खर्च प्रत्येक विद्यार्थ्यांना परवडेलच असा नाही. म्हणून शासनाने वसतिगृह सुरु करावेत अशी मागणी अभाविप करत आहे. त्याचबरोबर ज्या वसतिगृहात कोव्हिड विलागिकरण केंद्र होते असे वसतिगृह निर्जंतुक करावे. असे निवेदन सी निवेदन स्थायी जिल्हाधिकारी मा. जयश्री कटारे यांना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कुलसचिव मा प्रा प्रफुल्ल पवार यांना देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रांत वसतिगृह संपर्क प्रमूख विलास ठाकरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर सहमंत्री दयानंद शिंदे तसेच विद्यापीठ शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा