पुरंदर, दि. ९ जुलै २०२०: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या माथेफिरुनवर कडक कारवाई करण्याची मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे .पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे नीरा, शहर अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी याबाबतचे निवेदन आज जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस माने यांना दिले आहे.
भारतीय राज्यघटनेचे घटनाकार प.पू. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजदूत निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने ८ जुलै रोजी हल्ला केला. हे निवासस्थान भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. अशा घटना या पुढे कोणत्याही राष्ट्रीय स्मारकाबाबत होता कामा नये. हल्ला करणा-या माथेफिरूवर कडक कारवाई करण्यात यावी. जेणे करून या पुढे अशा घटना होणार नाहीत. तसेच अशा ठिकाणी कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा.अशी मागणी राषट्रवादीतर्फे करण्यात आली आहे. या भ्याड कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नीरा शहर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नीरा शहर, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया पुरंदर तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नीरा – कोळविहरे गण यांनी जाहीर निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.. या संबंधी पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार, सासवड व जेजुरी पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आले आहे.
या प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संचालक प्रा.दिगंबर दुर्गाडे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नीरा शहर अध्यक्ष प्रमोद काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्यासाहेब खाटपे, बंटी पवार, विद्यार्थी काँग्रेस पार्टी पुरंदर तालुका अध्यक्ष संदेश पवार,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नीरा शहर अध्यक्ष कामेश जावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती उपाध्यक्ष राजू देसाई व सोशल मीडिया अध्यक्ष नीरा कोळविहीरे अध्यक्ष अनिकेत सोनवणे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे