गोल पोस्ट राजकारण कुर्डुवाडी-कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी…

कुर्डुवाडी-कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी…

माढा, १७ डिसेंबर २०२०: कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावरून मोडनिंब, पंढरपुर, मिरज, कोल्हापुर या मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं रेल प्रबंधक आर.डी चौधरी यांच्याकडं एका निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाची प्रत वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद करण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानं मंदिरं उघडण्यात आली. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातून देवदर्शनासाठी पंढरपूर व कोल्हापूरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. प्रवासी वाहतूक बंद असल्यानं नागरिकांना अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनानं वेळीच वाहतूक सुरू करावी अन्यथा मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल, असं निवेदनात म्हटलं आहे.

यावेळी विद्यार्थी सेनेचे माढा तालुकाध्यक्ष राहुल सुर्वे, शहराध्यक्ष सागर बंदपट्टे, शहर संघटक आकाश लांडे, शहर उपाध्यक्ष गणेश चोैधरी, शहर सरचिटणीस सोमनाथ पवार, सोमनाथ शिरगिरे, नागेश सादरे, रामभाऊ थोरात, बालाजी कदम उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version