महिलेवर बंदूक रोखून केली शरीरसुखाची मागणी

लातूर, दि.३० मे २०२०: घरात एकटीच असल्याचा फायदा घेत महिलेवर बंदूक रोखून शारिरिक सुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना खानापुर तांडा (ता.औसा) येथे घडली. याप्रकरणी औसा पोलिसात शुक्रवारी ( दि.२९) रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली महिती अशी की, पिडीत महिलेचे पती मोलमजुरी करतात. नेहमीप्रमाणे सकाळी पती सासू सासरे मोलमजुरी करण्यासाठी दुसऱ्या गावी गेले. त्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील व्यक्ती अरुण रेवा चव्हाण हा घरी आला. यावेळी पिडित महिला ९ महिन्याच्या मुलासह घरात एकटीच होती.

यावेळी त्याने पिडीत महिलेवर बंदूक रोखून तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केली. तसेच, तू कोणाला सांगितल्यास तुला, तुझ्या बाळासह पतीलाही जिवे मारेन अशी धमकी दिली. पिडीत महिलेने आरडाओरडा करताच, शेजारी वास्तव्यास असलेले पिडीत महिलेचे चुलत दिर तिथे धावत आले आणि आरोपी पळून गेला.

याप्रकरणी आरोपी अरुण रेवा चव्हाण यांच्यावर औसा पोलिसात कलम ४५२, ३५४ अ, ५०६ व शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा