नागपूर आणि पूर्व विदर्भात डेंग्यूचा कहर, आतापर्यंत २५३ पॉझिटिव्ह रुग्ण

8

नागपूर, २२ ऑगस्ट २०२३ : नागपूर शहरात डेंग्यूची साथ दिवसेंदिवस वाढत आहे. लकडगंज परिसरात सर्वाधिक लोक डेंग्यूने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. शहरात आतापर्यंत डेंग्यूचे २ हजार ९७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २५३ शहरातील आणि ७५ ग्रामीण रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. डेंग्यूच्या बाबतीत विदर्भात नागपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. एकदा डेंग्यू बरा झाल्यानंतर पुन्हा डेंग्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डेंग्यूच्या चार सेरोटाइपची चाचणी शहरात उपलब्ध नाही. त्यामुळेच पुण्यातील प्रयोगशाळेत नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांमध्ये डेंग्यूबाधितांचा आकडा ५०० ओलांडला आहे. यातील ६५ टक्के रुग्ण हे शहरातील आहेत. लकडगंजमध्ये अधिक रुग्ण आल्यानंतर महापालिकेकडून औषध फवारणी केली जात आहे. यासोबतच घरोघरी जाऊन सर्वेक्षणही करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात १ जानेवारी ते २० ऑगस्ट या कालावधीत एकूण ५०० रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश रुग्ण जुलै आणि ऑगस्टमध्ये दिसून आले.

रुग्णांची संख्या- शहर-२५३
ग्रामीण -७५
वर्धा – २३.
भंडारा-१०
गोंदिया – ५१
चंद्रपूर-३२
गडचिरोली-६०

डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होणे सामान्य आहे. ही तक्रार ४० ते ६० टक्के रुग्णांमध्ये आढळते, परंतु ५ ते १० टक्के रुग्णांमध्ये अत्यंत कमी प्लेटलेट्समुळे ती प्राणघातक ठरू शकते. डेंग्यू झाल्यास आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, ७-१४ दिवस विश्रांती घेणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा