दंतचिकित्सा शिबिर सर्वांसाठीच प्रेरणादायी – डेंटिस्ट अमृता पिंपळे

फलटण २० मे २०२३ : ग्रामीण भागातील जनतेमध्ये असणारा एकोपा व नेत्यांबाबत असणारे प्रेम याचे उत्तम उदाहरण म्हणजे गावातील जनता. शंभर वर्ष पूर्ण झालेल्या आसू नंबर एक सोसायटीमध्ये होणारे दंतचिकित्सा शिबिर सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे मत पुणे येथील प्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर अमृता पिंपळे यांनी केले.

आसू तालुका फलटण येथे आयोजित श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व शिवाजीराव माने यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत दातांचे शिबिर तपासणी आयोजित करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर युवक नेते श्रीमंत धीरेद्रराजे खर्डेकर सिद्धसेनराजे खर्डेकर, डॉक्टर किन्नरी जैन विक्रीकर निरीक्षक रघुवीर माने पाटील आसू गावचे सरपंच महादेवराव सकुंडे मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन प्रमोद अण्णा झांबरे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामी साबळे ,आसू नंबर एक सोसायटीचे चेअरमन रवी ढवळे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित डॉक्टरांचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी स्वागत करून शिबिरास सुरुवात केली. यावेळी बोलताना डॉक्टर पिंपळे म्हणाल्या की ग्रामीण भागातील लोकांचे दाता विषय असणाऱ्या समस्या व त्या समस्या वरती उपाय योजना हे आजच्या शिबिरामध्ये आम्ही मार्गदर्शन करणार आहोत मोठ्या प्रमाणात उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना दाता विषयी असणाऱ्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे हे शिबिर आसू गावातील ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

फलटण तालुक्याचे विकासारत्न श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब व आसू तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराव माने पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मोफत शिबिराचे आयोजन हा एक प्रेरणादायी उपक्रम आहे या उपक्रमाचे उत्तम नियोजन आसू व परिसरातील ग्रामस्थांसाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे मत जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केली.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर यांनी केले कार्यक्रमास आसू व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी :आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा