जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान

बारामती, दि. १ जुलै २०२०: बारामती शहरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे काल मंगळवारी बस मधून शहरात प्रवेश झाला ठरल्याप्रमाणे बस शहरात न थांबता बसने पंढरपूरकडे प्रस्थान केले दरवर्षीची मुक्कामाची परंपरा आहे. मात्र यंदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पायी पालखी सोहळा व सर्व धार्मिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले दर वर्षी टाळ मृदुनगच्या गजरात पालखीचे स्वागत पाटस रोड वरील बारामतीच्या वेशीत बारामतीच्या प्रथम नागरिक करतात

बारामतीची शेकडो वर्षाची परंपरा असल्याने बारामती शहरात भक्तिभावाने पालखीचे स्वागत करत वाजत गाजत स्वागत करण्यात येते शहरातील अनेक मंडळे व सामाजिक संस्था पालखीचे भक्तिभावाने स्वागत करत वारकऱ्यांची सेवा केली जाते मात्र यंदा कोरोना संसर्गामुळे ही परंपरा खंडित झाली असुन संत तुकाराम महाराजांच्या पादुका एसटी बस मधून पंढरपूकडे प्रस्थान करण्यात आले तुकाराम महाराजांच्या पादुका यंदा पालखी ऐवजी एसटी बस मधून मोजक्या वारकऱ्यांसह पाच वाजता आगमन झाले आणि तसेच पुढे पंढरपूरकडे पालखी मार्गस्थ देखील झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा