डिप्रेशन..गरज आत्महत्येची ..का मोकळ्या श्वासाची……!

अधूनमधून अशा काही घटना घडतात, की त्यामुळे समाज मन हेलावून जाते मग चर्चा चर्वण होते, आणि काही काळाने सगळं शांत होऊन जाते….

सुशांत सिंग राजपूत याने गळफास लावून आत्महत्या केली आणि अशा चर्चांना परत उधाण आले. ही चर्चाही आशीच दोन दिवस चालणार आणि परत सगळे शांत होणार… मग अशा घटनांवर ठोस पावले आपण कधी उचलणार…?
सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या डिप्रेशन बद्दल प्रामुख्याने जास्त प्रमाणात चर्चा झाली.
काय असू शकेल हे डिप्रेशन? का येत असेल? एवढी श्रीमंती असतानाही आत्मत्या का?
असे अनेक प्रश्न लोकांना पडलेय….
नाही नाही… मी इथे त्या प्रश्नांची उत्तरे नाही देत आहे…. पण या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील आणि त्याचे अवलोकन ही करावे लागेल जेणे करून परत कोणी असे धाडस करणार नाही…

असे म्हणतात की कमकुवत मनाचे लोक आत्महत्या करतात , पण मला वाटते की आत्महत्या करायला धाडस लागत, काही तरी असे घडावे लागते की सारे मार्ग बंद झाले आहे आणि आता दुसरा काही पर्याय उरला नाही… तेव्हा माणूस या मार्गाला वळतो.
आणि कदाचित या रुपेरी झगमगत्या दुनियेला भुलून येणाऱ्या ८०% लोकांच्या मनात कधी न कधी हा विचार येऊन गेलेला असेल…माझ्याही मनात कधी तरी हा विचार येऊन गेला आहे. पण म्हणून प्रत्येक जण त्या मार्गाला जात नाही. तो त्या पेक्षा दुसरा मार्ग शोधतो.
पण मग सुशांत ने हा मार्ग का निवडला….?

पण या झगमगत्या पडद्यामागे अनेक कटू सत्य ही आहेत.
याच मुळे अनेकांनी या मार्गाचा अवलंब केलेला आपण पाहतो. गेल्या काही महिन्यात सुशांतसह अनेकांनी हा मार्ग अवलंबला, प्रत्येकाची करणे वेगवेगळी असतील ही पण यातील मुख्य सामायिक कारण हे सातत्याने असुरक्षिततेची निर्माण होणारी भावना…

खरं तर या दुनियेत येणारा प्रत्येक जण हा अतिशय सामान्य परिस्थितून येतो….स्ट्रगल करतो …स्वतःची ओळख निर्माण करतो…आणि मग सुरू होतो तो अस्तित्वाचा झगडा.. शिखरावर पोहोचण्याची आणि तिथेच अढळ राहण्याची धडपड…
साम, दाम, दंड, भेद या सारखे मार्ग प्रत्येक जण अवलंबायला लागतो, कोण समोरच्याला खुजा करण्याचा प्रयत्न करतो तर कोणी त्याचे स्थान खाली कसे येईल या साठी प्रयत्न करतात. याच मुळे अस्थिरतेचा मुकुटमणी घेऊनच सगळे वावरत असतात.
समोरच्याला प्रोत्साहन देणारे आणि त्याच्या कामाची स्तुती करणारे या इंडस्ट्री मध्ये अभावानेच आढळतात…

मात्र मला वाटते की हे चित्र काही आज सुरू झाले नाही , हे पूर्वी पासूनच चालत आले आहे , एवढेच आहे की आताचा स्पीड जर जास्तच वाढला आहे.
आणखी एक मुद्दा सुशांतच्या आत्महत्येनंतर चर्चिला गेला तो म्हणजे प्रस्थापित गटाच्या विरोधाला टक्कर देत स्वतःचे स्थान निर्माण करणे … अतिशय टॅलेंट असूनही यांना वेळोवेळी स्वतःला सिद्ध करावे लागते, या बाबत कंगना रणावत आणि सिकंदर खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली खदखद बोलून दाखवली आहे. आणि या प्रस्थापितांच्या विरोधाला न जुमानता ताठ उभे राहिलेल्यांमध्ये राजकुमार राव, कंगना, अरुण शौरी, आयुष्यमान खुराणा, नवाजउद्दीन सिद्दिकी, इरफान खान अशी मोठी लिस्ट आहेच…

आणि या प्रस्थापितांच्या विरोधाचे आणि डिप्रेशनच्या बळींची ही काही कमी नवे नाहीत….
गुरू दत्त यांच्या पासून ही लिस्ट सुरू होऊन जिया खान दिव्या भरती, प्रेक्षा महेता, कुशल पंजाबी, नितीन कपूर, प्रतुषा बॅनर्जी, सिल्क स्मिता अशी अनेक नावे घेऊनही हे इथेच थांबत नाही आणि हे वाढतच राहणार आहे. त्यातून तुम्हाला स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आणि तुमचे सगळे मार्ग बंद झाले असेल तर तुम्हाला मोकळे होणे हे जास्त गरजेचे आहे.. सतत बोलत राहा… आपल्या मनातली खदखद बोलून दाखवा…..मन मोकळे करा…

या शिवाय आणखी एक घटक मला महत्वाचा वाटतो तो म्हणजे, एकटे पणा….
इथे येणारे अनेक जण हे एकट्याने रहातात जी डिप्रेशन ची पहिली पायरी म्हणता येईल.
आणि तुम्ही आजपर्यंत आत्महत्या केलेल्या व्यक्तींचा आढावा घेतलात तर ७०% पेक्षा जास्त लोक हे एकट्याने राहत होते असे दिसते.

भारतीय संस्कृती ही पारिवारिक आहे, त्याची आपल्या सर्वांना सवय आहे, गरज म्हणून एकट्याने राहावे लागते पण त्यातूनच एकटेपणाची जाणीव तयार होते जी घातक ठरू शकते.
यासाठी प्रत्येकाने जर आजूबाजूला नजर टाकली आणि अशांना आपल्या मैत्रीचा हात देता आला तर ….
नक्कीच विचार करा…आणि अस काही आपल्याही बाबतीत झाला असेल तर नक्की व्यक्त व्हा….
व्यक्त व्हावेसे वाटले तर आम्हाला पाठवा… आम्ही तुमच्या भावनांना प्रकाशित करू….

आजच्या कामाच्या, पैशाच्या, ताणाच्या, मानापमानच्या, खच्चीकरणाच्या व तत्सम सर्व नकारार्थीच्या विचाराने ग्रासलेल्या समाजातील अशा लोकांना गरज आहे ती मोकळ्या श्वासाची ना की आत्महत्येची ……….

व्यक्त व्हावेसे वाटले तर आम्हाला पाठवा… आम्ही तुमच्या भावनांना प्रकाशित करू

– प्रवीण वानखेडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा