गोल पोस्ट इतर राजकारण राज्यातील विविध विभागांत लवकरच दीड लाख पदांची भरती, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

राज्यातील विविध विभागांत लवकरच दीड लाख पदांची भरती, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३ : राज्यातील विविध विभागांत दीड लाख पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या संदर्भात मंत्रालयात बैठका सुरू असून, लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

अजित पवार हे सध्या वारंवार काही ना काही घटनेवरून ट्रोल होत आहेत. दरम्यान त्यांनी मी काल दिवसभर राज्यातील नोकरभरती संदर्भातील बैठकीत होतो, असे सांगितले. तसेच राज्यातील आरोग्य, शिक्षणासह अनेक विभागांत १.५ लाख नोकरभरती होणार आहे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असल्याने या विभागातील डॉक्टर, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी, त्यांच्या पदांसाठी किमान तीन महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version