उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त

मुंबई, २ नोव्हेंबर २०२०: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झाले असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात अजित पवार सातत्याने दौरे व बैठका घेण्यात व्यस्त होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते सर्वतोपरी काळजीही घेत होते. राज्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. त्यानंतर त्यांनी घरीच विश्रांती घेत घरातूनच काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते.

खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आता उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

घरी परतल्यानंतर ते आठ दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर, डॉक्टर व कार्यकर्त्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा