सोलापूरात नूतन महसूल भवनाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

10

सोलापूर, २५ मे २०२३: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. आज दुपारी एक वाजता सात रस्ता येथे बांधण्यात आलेल्या सोलापूरातील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचा उद्धाटन सोहळा संपन्न झाला. कोनशिलेच्या उद्धाटनानंतर त्यांनी परिसरातील संविधान प्रास्ताविक शिलालेखाचे उद्धाटन केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दालनात येऊन त्यांनी पाहणी केली.

त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जेष्ठ आमदार सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. समाधान आवताडे, आ. राम सातपुते, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. शहाजी बापू पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची उपस्थिती होती.

दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस यांचे महसूल भवन या ठिकाणी आगमन झाले. रिबन कापण्याआगोदर ते पाच मिनिट थांबल्याचे पाहायला मिळालं. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही येईपर्यंत त्यांनी फित कापली नाही. जेव्हा त्यांच्या शेजारी खासदार आले तेव्हा त्यांनी रिबन कापली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर