डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा ४० दिवसांची पॅरोल मंजूर

चंडीगढ , २१ जानेवारी २०२३ :डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. तब्बल ४० दिवसांसाठी राम रहीम तुरुंगाबाहेर येणार आहे. आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राम रहीम २० वर्षांची शिक्षा भोगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याला पॅरोल मंजूर झाल्याची बातमी कळताच आश्रमामध्ये स्वागताची जंगी तयारी सुरु झाली आहे. याआधी तीन महिन्यांपूर्वी देखील गुरमीत राम रहीम याला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला होता. २५ नोव्हेंबर रोजी त्याचा पॅरोलचा कालावधी संपला. त्यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी पॅरोलवर बाहेर आल्यावर तो उत्तर प्रदेशच्या त्याचा बरनावा आश्रमामध्ये गेला होता.

दरम्यान, हरियाणाचे जेलमंत्री रंजीत सिंह चौटाला यांनी डेरा प्रमुखाच्या पॅरोल याचिकेवर टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते की, डेरा प्रमुखाने ४० दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला आहे. तो अर्ज विभागीय आयुक्तांना पाठवल्यांचे त्यांनी सांगितले होते. आता पुन्हा एकदा पॅरोल मंजूर झाल्यावर या कालावधीमध्ये डेरा प्रमुख २५ जानेवारीला होणार्‍या माजी डेराप्रमुखांच्या जयंती कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

  • गेल्या पॅरोलमध्ये लॉन्च केली तीन गाणी

दरम्यान, २०२२ मध्ये पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला असताना राम रहीमने तीन गाणी लॉन्च केली होती. पॅरोलदरम्यान राम रहीमने ऑनलाइन सत्संगही केला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा