देशातील सर्वात मोठे डिटेक्शन सेंटर येथे होणार..

आसाम: आसाममध्ये देशातील सर्वात मोठे डिटेंशन सेंटर बांधले जात आहे. आसामच्या गोवळपारा जिल्ह्यात बंदोबस्त शिबिरात घुसखोरांना कैद केले जाईल. आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) तयार केली गेली आहे. ज्यांची नावे राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये हजर नाहीत आणि त्यांना परदेशी न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाला नाही, तर त्यांना ताब्यात घेण्यात येईल. जर एखादी व्यक्ती अवैधपणे देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना पकडली गेली असेल तर त्याला डिटेंशन सेंटरमध्येही ठेवण्यात येईल.

आसाम मधील गोवालपारा येथे डिटेंशन सेंटर मध्ये बरेचसे कर्मचारी व मजूर कार्यरत आहे. येथे डिटेक्शन सेंटर चे काम जलद गतीने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी चार मजली इमारती बांधण्यात येणार आहे. या इमारतींची संख्या पंधरा असणार आहे. या डिटेक्शन सेंटरचे काम ६५ क्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले आहे. हे डिटेक्शन सेंटर बनवण्यासाठी आत्तापर्यंत ४६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या डिटेक्शन सेंटर मध्ये जवळजवळ ३००० घुसखोरांना ठेवण्याची व्यवस्था केली आहे.

आसामच्या सहा जिल्हा कारागृहात डिटेक्शन केंद्र सुरू आहेत. ही कारागृह दिब्रूगड, सिलचर, तेजपूर, जोरहाट, कोकराझार आणि गोवालापारा येथे आहेत. त्यामध्ये सुमारे ८०० लोक राहत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार डिटेंशन सेंटरची संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली. त्याअंतर्गत भारतीय भूमीवर परदेशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा