देश आणि बलात्काराच्या शिक्षा

कोणत्याही व्यक्तीबरोबर त्याच्या मर्जीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार. बलात्कार हा एक गंभीर गुन्हा आहे. जर बलात्कारामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असतील तर त्यास सामूहिक बलात्कार असे म्हटले जाते. बलात्कार सगळ्यात क्रूर पद्धतीचा गुन्हा समजला जातो. आणि याची शिक्षा जन्मठेप किंवा फाशी ही सुद्धा असू शकते.
बलात्काराची तक्रार नोंदवणे, त्यावर खटला चालवणे आणि त्यावर शिक्षा देणे या सगळ्या गोष्टी प्रत्येक देशांच्या सीमेनुसार बदलतात. तर आपण आज अशा पाच देशांविषयी माहिती घेणार आहोत की जेथे बलात्काऱ्यांना सगळ्यात जास्त भयानक शिक्षा मिळते.
संपूर्ण जगभरातील विविध सरकार आपल्या नागरिकांना सुरक्षित वातावरणात राहता यावे यासाठी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्या विरोधात अत्यंत कडक नियम आणि कायदे बनवले आहेत.
त्यांनी हे ठरवले आहे की जो कोणी हा अपराध करेल त्याला या समाजात राहण्याचा अधिकार नाही. काही ठिकाणचे दंड तर इतके अमानुष पद्धतीचे असतात की तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.याबाबत एक संकेतस्थळांने दिलेल्या माहितीनुसार,

सौदी अरेबिया
इस्लामिक देश सौदी अरबमध्ये कायदा इस्लामी नियमानुसार आहे. येथे रेपिस्टला तोपर्यंत दगडे मारली जातात. जोपर्यंत तो मरत नाही. याशिवाय आरोपींना भयानक यातना दिल्या जातात.

फ्रान्स
फ्रान्समध्ये बलात्काऱ्यांना पंधरा वर्षांसोबत अत्यंत अमानुष पद्धतीची कारावासाची शिक्षा होते. याची तीव्रता पीडितेवर होणाऱ्या अत्याचारावर आणि नुकसानीवर अवलंबून असते. ही शिक्षा तीस वर्षांच्या जन्मठेपेपर्यंत सुद्धा वाढवली जाऊ शकते.

नेदरलँड
नेदरलंडमध्ये रेपच्या शिक्षेबाबतच सोडा पण जबरदस्तीने फ्रेंच किस घेतला तरी शिक्षा होते. आरोपीला वयानुसार, ४ ते १५ वर्षापर्यंत शिक्षा दिली जाते. एवढेच नव्हे तर सेक्स वर्कर महिलांनाही सेक्शुअल असॉल्टबाबत ४ वर्षाची शिक्षा होऊ शकते. आपल्याला माहित असेलच की, जगातील अनेक देशात सेक्स वर्कर महिलांना शिक्षा देण्याची तरतूदच नाही.

इराण
इराणमध्ये बलात्काऱ्याला एकतर फाशी दिली जाते किंवा त्याला सार्वजनिक स्वरूपात मारून टाकले जाते. कधी कधी दोषीला पीडिताच्या अनुमती नुसार मृत्यू दंडापासून वाचवले जाते. रेप करणाऱ्यांना जाहीर फाशी देत पीडितेला मदत दिली जाते. गुन्हेगारांना जोड्यांनी मारण्याची पद्धत तेथे आहे.

चीन
चीनमध्ये रेप करणाऱ्याला कॅपिटल पनिशमेंट; दिली जाते. चीनमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांना फाशीची शिक्षा दिली गेली आहे. चीनमध्ये शिक्षाही लवकर दिली जाते. तसेच अनेक कैद्यांचे प्रायवेट पार्ट कापून टाकले जातात.

अफगाणिस्तान
अफगाणिस्तानमध्ये पीडितेला न्याय देण्यासाठी फक्त चार दिवसांमध्ये बलात्काराच्या डोक्यात गोळी मारली जाते.

उत्तर कोरिया
उत्तर कोरियाबाबत संपूर्ण जानते. तेथील हुकुमशहा छोट्या छोट्या घटनेवरून मृत्यूदंड देतो. गुन्हेगारांना तेथे कडक शिक्षा दिली जाते. तर रेपिस्टना तेथे थेट फाशीची शिक्षा दिली जाते. आरोपींना मृत्यू देण्याच्या वेगवेगळ्या व क्रूर पद्धती आहेत. रेपिस्टच्या डोक्य़ात गोळ्या घालण्यापासून विविध क्रूर पद्धतीने मारण्याच्या कायद्यात तरतूद आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा