देशाला पहिली रेसिंग सायकल देणारी एटलस कंपनीचे काम ठप्प

नवी दिल्ली, दि. ४ जून २०२०: बुधवारी विश्व सायकल दिवस होता. त्याच दिवशी भारतातील ६९ वर्षापासून सुरू असलेली ॲटलास सायकल कंपनीने आर्थिक कारणास्तव कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीमध्ये तब्बल ४५० कामगार काम करत आहे. कंपनीचे काम थांबल्यामुळे आता या कामगारांच्या समोर पोट भरण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. एक काळ असा होता की या कंपनीने वर्षाकाठी ४ दशलक्ष सायकली बनविण्याचा विक्रम केला होता, परंतू आता ले-ऑफ-नोटीसमध्ये कंपनीचे व्यवस्थापक म्हणाले की कारखाना चालविण्याकरता ऑपरेटरकडे पैसे नाहीत. कंपनी चालवण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने कच्चामाल घेणे सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे कंपनीचे कामकाज सध्या थांबवण्यात आले आहे.

कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्या मध्ये होती कंपनीकडे उपलब्ध असलेला सर्व राखीव निधी कंपनीने खर्च करून टाकला आहे. आता कंपनीवर अशी परिस्थिती ओढवली आहे की उत्पन्नाचे कोणतेही साधन शिल्लक राहिलेले नाही. कंपनी आपला रोजचा खर्च भागवू शकेल एवढे देखील कंपनीकडे सध्या पैसे शिल्लक नाहीत. नोटीसमध्ये, व्यवस्थापकाने कर्मचार्‍यांना सांगितले आहे की, ऑपरेटर पैसे व्यवस्थापित करेपर्यंत कारखान्यात कच्चा माल येणार नाही. अशा परिस्थितीत ऑपरेटर कारखाना चालवण्याच्या स्थितीत नाहीत. या नोटीसमध्ये कामगारांना ३ जूनपासून काढून टाकण्यास सांगितले आहे.

जानकी दास कपूर यांनी १९५१ मध्ये स्थापन केलेल्या अ‍ॅटलास सायकल कंपनीने पहिल्या वर्षी १२ हजार सायकली बनविण्याचा विक्रम केला. १९६५ पर्यंत ही कंपनी देशातील सर्वात मोठी सायकल उत्पादक बनली. १९७८ मध्ये भारतात प्रथम रेसिंग सायकल आणून अ‍ॅटलासने जगातील सर्वोच्च सायकल उत्पादक कंपन्यांपैकी एक होण्याचा मानही मिळविला आहे. कंपनीला ब्रिटिश मानक संस्थांकडून आयएसओ ९००१-२०१५ प्रमाणपत्र देऊन अधिकृत केले गेले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा