देशात पाच महिन्यात २५ हजार चाईल्ड पॉर्न अपलोड

नवी दिल्ली : अमेरिकेने भारताला चाईल्ड पॉर्नसंबंधी धक्कादायक आकडेवारी सोपवली आहे. देशात गेल्या ५ महिन्यात चाईल्ड पॉर्नशी संबंधित २५ हजार मटेरिअल वेगवेगळ्या सोशल साईटवर अपलोड करण्यात आले आहे. ही आकडेवारी अमेरिकेच्या नॅशनन सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनने (NCMEC) भारताच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे सोपवली आहे.
गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित गोष्टी अपलोड करण्याच्या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे.
याशिवाय महाराष्ट्र, गुजरात. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांचाही या यादीमध्ये समावेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
आतापर्यंत ७ एफआयआर दाखल झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वात जास्त प्रकरणं समोर आली आहे.
मुंबईत ५०० प्रकरणे आहेत. दिल्ली, गुजरात व केरळमध्ये ही आकडेवारी मिळण्याआधीच कारवाई करण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अनेक एफआयआर दाखल करण्यात आले असून देशभरात अनेक ठिकाणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा