देशातील ११ कामगार संघटनांचा ८ जानेवारीला देशव्यापी संप

अहमदनगर : देशातील ११ कामगार संघटनांनी सरकारच्या कामगार, शेतकरी व सर्वसामान्य माणुसविरोधी धोरणाचा निषेध आणि मुख्य मागण्यांसाठी ८ जानेवारीला देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
नगरमधील सर्व कामगार संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सकाळी १० वाजता एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांचा मोर्चा नेण्यात येणार असल्याचे ठरले आहे.

या मोर्चामध्ये राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सिटू, आयटक, लाल बावटा विडी कामगार संघटना, इंटक विडी कामगार संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, अहमदनगर वर्कर्स युनियन (टीयुसीसी), महाराष्ट्र इंजीनिअरिंग उद्योग संघटना, महाराष्ट्र विक्री आणि वैद्यकिय प्रतिनिधी संघटना, महानगरपालिका कामगार संघटना, अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, अखिल भारतीय किसान सभा, क्रांतिसिंह कामगार संघटना सहभागी होणार आहेत.
अॅड.कॉ.सुभाष लांडे हे या बैठकीचे अध्यक्षस्थानी होते. प्रा.डॉ.कॉ.महेबुब सय्यद यांनी संचलन केले.

राज्य कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, कॉ.सिध्देश्वर कांबळे, कॉ.सुभाष कांबळे, कॉ.सतीश भुस, कॉ.संदीप निंबाळकर, कॉ. शंकरराव न्यालपेल्ली, कॉ. महादेव पालवे, कॉ.मिलिंदराव जपे, कॉ.दिपकराव शिरसाठ, कॉ.तुषार सोनवणे, यशवंत तोडमल, भाऊसाहेब डमाळे, भैरवनाथ वाकळे, कॉ.विकास गेरंगे आदी उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा