देशभरातील PFI च्या छाप्यांवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया

केरळ, २२ सप्टेंबर २०२२ : राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA, अंमलबजावणी संचालनालयान आणि राज्य पोलिस यांच्या मदतीने आज सकाळपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटका सह दहा राज्यांमध्ये (PFI) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. आतापर्यंत PFI च्या १०६ सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

तर यावर आता काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केरळमध्ये पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. ते बोलतात सर्व प्रकारच्या जातीवाद आणि हिंसाचार मग तो कुठूनही आलेला असेल हे सर्व एकसारखेच आहेत, त्यामुळे त्यांचा सामना केला पाहिजे. यासाठी झिरो टॉलरन्स ठेवला पाहिजे. अशा शब्दात राहुल गांधी यांनी PFI च्या कार्यालयावरील छाप्या बाबत भाष्य केले आहे.

PFI वर देशात हिंसाचार भडकवणे, दहशतवादी हल्ले करणे, दंगे भडकवणे, आणि टेरर फंडिंग सारखे गंभीर आरोप आहेत. तर PFI संघटनेचे डी कंपनी सोबत संबंध असल्यास उघड झाला आहे. तर NIA च्या तपासात महत्त्वाची पुरावे मिळू शकतात. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, यांनी छापेमारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ( NSA) अजित डोभाल आणि गृह सचिवांसोबत महत्वाची बैठक बोलावली आहे.

टेरर फंडिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी PFI संघटना ED च्या रडावर आहे. तर या छापेमारीमुळे येत्या काही दिवसात PFI या संघटनेवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा