मोठा स्कोअर करूनही न्यूझीलंडने धावांचे लक्ष केले आरामात पार, भारताला स्वीकारावा लागला पराभव

ऑकलंड, २५ नोव्हेंबर २०२२ : आज भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेट सामन्यांना सुरवात झाली. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंड ३०७ धावांचे लक्ष्य दिले होते; पण हवी तशी गोलंदाजी झाली नसल्याने न्यूझीलंडने ३०७ धावांचे लक्ष्य आरामात पार केले.

दरम्यान, न्यूझीलंड संघाने १-० ने आघाडी मिळवली. केन विलियम्स आणि टॉम लॅथम यांनी दमदार फलंदाजी केली. टाॅम लॅथमने ७६ चेंडूंत शतकाचा टप्पा पार केला. लॅथमने कॅप्टन विलियम्ससोबत २०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. हे भारताला पराभव स्वीकारावा लागल्याचे कारण असू शकते.

भारतीय संघाने पहिल्या २० ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. ८८ धावांमध्ये न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले; पण चेंडू जुना झाल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांची दिशा आणि टप्पा चुकला. त्यामुळेच भारताचा पराभव झाला. तरी मालिकेतील पुढील दोन सामन्यांत काय निकाल लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा