कमी स्क्रीन असूनही, ‘द काश्मीर फाइल्स’ला मिळाली चांगली ओपनिंग

मुंबई, 13 मार्च 2022: अनुपम खेर स्टारर ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने 11 मार्च रोजी चांगली सुरुवात केली आहे. काश्मिरी पंडितांवर बनलेल्या हृदयद्रावक चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अनेकांची मने जिंकली आहेत. चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली आहे. काश्मीर फाइल्सला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊया चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन किती आहे.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी काश्मीर फाइल्सच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले. ते लिहितात की- ‘#TheKashmirFiles ने पहिल्या दिवशी एक मोठं सरप्राईज दिलं…मर्यादित स्क्रीन असूनही दिवसअखेरीस चित्रपट मजबूत चालला…दुसऱ्या आणि तिसर्‍या दिवशी संध्याकाळ आणि रात्रीचे शो असाधारण होते… प्रचंड वाढ होईल, हे नक्की…शुक्रवारी 3.55 कोटी #India.’

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, काश्मीर फाइल्स 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित आहे. भारताच्या इतिहासातील ही एक अत्यंत क्लेशदायक घटना आहे, जी काश्मिरी आणि इतर भारतीयांच्या मनात अनेक दशकांपर्यंत राहील. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणारी दहशत, घबराट, भीतीने प्रेक्षकांना खूप उत्तेजित केले होते. आता त्याचाच परिणाम म्हणजे चित्रपट पाहण्यासाठी लोकांची ओढ लागली आहे.

561 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

काश्मीर फाइल्स भारतात 561 सिनेमागृहात, 113 परदेशातील स्क्रीन्समध्ये रिलीज झाली. ही संख्या इतर बिग बजेट चित्रपटांपेक्षा कमी आहे. मात्र असे असतानाही चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई आश्चर्यकारक आहे. या सिनेमात अनुपम खेर व्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावाडी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, पुनीत इस्सार यांच्यासह इतर कलाकार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा