कारच्या कॅमेऱ्यात कैद झाला विनाश, पाहा क्षेपणास्त्र हल्ल्याचा लाईव्ह व्हिडिओ

यूक्रेन, 4 मार्च 2022: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देशांमधील युद्ध आता धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवला चारही बाजूंनी घेरले आहे. त्यामुळे त्याचवेळी युक्रेनही बचावाऐवजी हल्ल्याची रणनीती अवलंबत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या हल्ल्याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरात कारच्या डॅशबोर्डवर बसवलेल्या कॅमेऱ्यात हल्ल्याचा व्हिडिओ कैद झाला आहे. ज्यामध्ये हे क्षेपणास्त्र रस्त्याने जात असलेल्या कारच्या समोरील इमारतीवर पडले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच चिंता वाढली आहे. युक्रेनवर ज्या प्रकारे क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत, ते कुठेतरी चिंताजनक आहेत.

एका माहितीनुसार, रशिया-युक्रेनमधील युद्धाबाबत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्रॉन यांनी पुतीन यांच्याशी 90 मिनिटे चर्चा केली आहे. त्याचबरोबर युक्रेनकडून दावा केला जात आहे की, या युद्धात 9000 रशियन सैनिक मारले गेले आणि 217 रणगाडेही नष्ट करण्यात आले. दरम्यान, रशियाशी लढण्यासाठी 16 हजार विदेशी सैनिक लढणार असल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा