गोल पोस्ट महाराष्ट्र वंजारी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध – हर्षवर्धन पाटील

वंजारी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध – हर्षवर्धन पाटील

इंदापूर, ६ सप्टेंबर २०२०: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची व माझी मैत्री महाराष्ट्राला माहीत होती. मुंडे साहेबांनी वंजारी समाजासाठी प्रचंड मोठे काम केले आहे. आगामी काळात पंकजाताई मुंडे यांच्या सहकार्याने इंदापूर तालुक्यातील वंजारी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे सोमवारी (दि.7) अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी लाखेवाडी येथील ऋषिकेश लक्ष्मिकांत नाईक व उपाध्यक्षपदी महेश बाळासाहेब उगलमोगले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

आगामी काळात तालुक्यातील वंजारी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकीताताई पाटील, निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू, असे यावेळी अध्यक्ष नाईक व उपाध्यक्ष उगलमोगले यांनी संगितले. याप्रसंगी रामचंद्र नाईक, बाळासाहेब उगलमोगले, दादा पानसरे,भागवत नाईक, अशोक उगलमोगले आदी मान्यवर उपस्थितीत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे.

error: Content is protected !!
Exit mobile version