दरोड्याच्या तयारीतील आंतरराष्ट्रीय टोळी मुद्देमालासह जेरबंद, पुण्यातील देवाची आळंदी पोलिसांची कामगिरी

पुणे, २३ ऑगस्ट २०२२: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीला देवाची आळंदी पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आले असून यातील सहा आरोपी नेपाळचे आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये टोळीच्या सूत्रधाराचा ही समावेश आहे.

या कारवाई मध्ये नयसिंग लालसिंग ग्रेली, निट बहुमसिंग ढमाई, विशाल शेटे, दिनेश नयसिंग ढोली, लक्ष्मण ग्रजु दमाई, नैनसी खडकमी ढोली ही आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. हे सर्व दरोडेखोर आळंदी परिसरातील कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच टोळीने आळंदी, चाकण, महाळुंगे पोलीस चौकी अंतर्गत जे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी बरेच गुन्हे उघड होण्यास पोलिसांनी यश मिळवले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे, हे सर्व आरोपी जेथे दरोडा टाकायचा आहे अशा कंपन्या अगोदरच्या दिवशी ठरवून तिथे ते चोरी करत होते. आम्हाला गुप्त माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी पावसामध्ये रात्रभर सापळा लावला. घटनेच्या वेळी आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांना पकडून अटक करण्यात आले.

पोलिसांनी या वेळी आरोपींकडून लॅपटॉप, कॉपर केबल, तांब्याची भांडी व इतर वस्तू असा एकूण ६ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा