भारतासारख्या विकसनशील देशांना लसीचा फॉर्म्यूला देऊ नये: बिल गेट्स

वॉशिंग्टन, १ मे २०२१: भारतासह संपूर्ण जगावर कोरोना चं संकट फैलावला आहे. भारतात तर आता रोजचा आकडा तीन लाखांच्या वर गेलाय. याबरोबरच जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण देखील केलं जात आहे. भारतात देखील जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देखील सुरू करण्यात आलीय. भारताने बऱ्याच देशांना मोफत लसिचं वाटप कलंय. मात्र भारतातील अनेक राज्यांमध्ये लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतोय. मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती करण्याची गरज असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, याच लस निर्मितीवरुन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील मोठ्या उद्योजकांपैकी एक असणारे बिल गेट्स यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतासहीत अनेक विकसनशील देशांना लसनिर्मितीचा फॉर्म्यूला देऊ नये असं म्हटलं आहे.

बिल गेट्स यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जागितक पातळीवर त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जातोय. बिल गेट्स यांनी स्काय न्यूज या विदेशी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. यावेळी सध्याच्या वैश्विक कोरोनास्थितीवर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये बैद्धिक संपदा हक्का हा कायदा बाजूला केल्यामुळे जगातील सर्व देशांना कोरोना लस मिळण्यासाठी मदत होईल का ?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी लसीचा फॉर्म्यूला इतर देशांना देण्यात येऊ नये असे स्पष्टपणे सांगितले.

नेमकं काय म्हणाले बिल गेट्स?

जगात अनेक औषधनिर्माण करणाऱ्या कंपन्या कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्मिती करत आहेत. सध्या जगातील लोक लसीच्या सुरक्षेबाबत अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे जगात सर्वांसोबत लसनिर्मितीचा फॉर्म्यूला शेअर केला जाऊ नये. लसनिर्मिती करणारी अमेरिकेची जॉन्सन अँड जॉन्सन आणि भारतात लस निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये मोठा फकर आहे,” असे वक्तव्य बिल गेट्स यांनी आपल्या मुलाखतीदरम्यान केलं.

लसीच्या सुरक्षेचा हवाला

यावेळी बिल गेट्स यांनी विकसनशील देशांना लस निर्मितीचा फॉर्म्यूला दिला जाऊ नये या मताचं समर्थन केलं. त्यासाठी त्यांनी लसीच्या सुरक्षेचा हवाला दिला. “लस निर्मितीचा फॉर्म्यूला हा एखाद्या पाककलेसारखा नाही, जो कोणालाही देता येईल. इथे बौद्धिक संपदेच्या हक्काची गोष्ट नाहीये. तर येथे सुरक्षेचा मुद्दा आहे. लस तयार करताना काळजी घ्यावी लागते. टेस्टिंग तसेच ट्रायल करावे लागतात. तसेच लस तयार करताना खूप खबरदारी घ्यावी लागते,” असे बिल गेट्स यांनी म्हटलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा