२०२० मधील क्रीडाविश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर

पुणे, २५ डिसेंबर २०२०: २०२० चे वर्ष जगाला वाईट गेले असून आज आपण क्रीडा विश्वातील काही घडामोडी वाचणार आहोत. ज्या मधे नुकतीच आयसीसीने खेळाडू बद्दल जाहीर केलेली रँकीग तर या वर्षात क्रिडा विश्वाला सोडून गेलेल्या म्हणजे जगाचा निरोप घेतलेले खेळाडू या बद्दल……
न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या सिरीजनंतर आयसीसीने रँकीग जारी केली आहे. ज्या मधे प्रथम क्रमांका वर इंग्लंडचा डेवीड मलान आहे. तर बाकीचे खेळाडू खालीलप्रमाणे…
२ नंबर बाबर आझम (पाकिस्तान)
३ नंबर के एल राहूल (भारत)
४ नंबर एराॅन फिंच (ऑस्ट्रेलिया)
५ नंबर रसी वॅन डर डुस्झाईन (साउथ आफ्रिका)
६ नंबर ग्लॅन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
७ नंबर विराट कोहली (भारत) विराट कोहलीला रँकीग मधे या फार मोठा झटका आहे,कारण या आधी विराट नंबर १ वर ज्याची या वर्षात थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.
८ नंबर काॅलीन मुनरो (न्यूझीलंड)
९ नंबर टिम सेफर्ट (न्यूझीलंड)
१० नंबर हजरतुल्ला जजाई
      २०२० हे जसे जगासाठी वाईट आहे तसेच क्रीडा विश्वाला ही याने काही कडू आठवणी दिल्या आहेत .या वर्षात अनेक दिग्गज खेळाडूंनी जगाचा निरोप घेतला. ज्यामुळे संपूर्ण क्रीडा विश्व हदरले.
१ कोब ब्रायंट (बास्केटबॉल पटू)
    २६ जानेवारी रोजी हॅलिकाॅप्टर च्या अपघातात या खेळाडू चे निधन झाले. तर ब्रायंट सह त्यांच्या १३ वर्षीय मुलगी गिएनाचाही या मधे मृत्यू झाला.
२ बलबिर सिंग डोसांज (हाॅकीपटू)
    भारताचे दिग्गज हाॅकीपटू बलबिर सिंग डोसाज यांचं २५ मे रोजी निधन झालं. त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारताला त्यांनी तीन सुवर्णपदक ऑलिंपिक मधे तर विश्वकप मिळवून दिले होते.
३ राजिदंर गोएल (क्रिकेटर)
    या वर्षी भारताचे महान फिरकीपटू राजिदंर गोएल यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी शरीर संबंधी आजारांमुळे निधन झाले.
४ चेतन चोहान (क्रिकेटर)
    चेतन चोहान यांचे कोरोना मुळे १६ ऑगस्ट ला निधन झाले.वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेर चा श्वास घेतला.
५ डिन जोन्स (ऑस्ट्रेलिया क्रिकेटर)
    ऑस्ट्रेलियन माजी खेळाडू डिन जोन्स यांचे या वर्षी मुंबईत निधन झाले.
६ चुनी गोस्वामी ( फुटबॉल प्लेयर)
   भारताचे फुटबॉलपटू चुनी गोस्वामी यांचं ३० एप्रिलला वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.
७ दिएगो मॅरेडोना (फुटबॉल प्लेयर)
संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेला अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोनांचं २५ नोव्हेंबरला निधन झाले.
    या सर्व खेळाडूंच्या जाणाने क्रीडा विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. तर २०२० च्या या क्रीडा विश्वातील सर्वात कटू आठवणी आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा