‘लव्ह जिहाद’प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई, १८ डिसेंबर २०२२ : गेल्या काही दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या मुद्द्यावरून राजकारण देखील तापलेलं दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याचं विधान केलं आहे. ‘लव्ह जिहाद’बाबत कायदा पारित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्य सरकारने स्थापन केलेली समिती आंतरजातीय विवाहांसाठी नाही, तर आंतरधर्मीय विवाहांसाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एका कार्याक्रमात या कायद्याविषयी माहिती दिली आहे. ‘लव्ह जिहाद’बाबत असलेल्या समितीविषयी श्री. फडणवीस म्हाणाले, की आंतरजातीय विवाहासाठी आमची वेगळी समिती आहे.

सरकार आंतरधर्मीय विवाहाच्या विरोधात नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. सध्या अशा अनेक घटना घडत आहेत. ज्यामध्ये आंतरधर्मीय विवाह झाल्यानंतर सहा-सात महिन्यांत मुलगी घरी परत येते. तिची फसवणूक होते; तसेच काही ठिकाणी अशा प्रकरणांच्या संख्येत वाढ होत असून हा आकडा धोक्याची घंटा ठरत आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

”कुठल्या तरी धर्माच्या लोकांना थांबवण्यासाठी किंवा दोन धर्मात विवाहच होऊ नयेत, म्हणून आम्ही ही समिती तयार केली नाही. दोन धर्मात सहमतीने विवाह होत असेल तर आम्हाला काहीही अडचण नाही; पण त्यामागे काहीतर कट शिजताना दिसत असेल तर तो थांबला पाहिजे, यासाठी ही समिती स्थापन केली आहे. अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई व्हावी, यासाठी ही समिती आहे. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणं थांबवायची कशी? हा प्रश्न माझ्यासमोरही आहे. त्यामुळे बाकीच्या भाजपाशासित राज्यांनी काय निर्णय घेतले? आणि त्याचा काय परिणाम झाला? याचा अभ्यास करूनच आम्ही निर्णय घेऊ,” असंही फडणवीस म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा