गोल पोस्ट इतर राजकारण न्यूज अरेना इंडियाच्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक पसंती, त्या...

न्यूज अरेना इंडियाच्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक पसंती, त्या पाठोपाठ अजित पवार, अशोक चव्हाण यांना पसंती

मुंबई २० जून २०२३: मागील काही दिवसांपासून वृत्तपत्रातील जाहिरातीमुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि दोन्ही पक्षात कटूता आली होती. हा विषय बाजूला जातो ना जातो तोच आता न्यूज अरेना इंडिया च्या सर्व्हेची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे आता शिवसेना भाजपमध्ये पुन्हा वाद होणार का अशीच चर्चा रंगू लागली आहे. न्यूज अरेना इंडिया च्या सर्व्हेत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात काय चित्र असेल याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

या सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्रीपदासाठी मतदारांची कोणाला सर्वाधिक पसंती आहे, याची सुद्धा माहिती देण्यात आलीय, त्यानुसार सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३५%, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना २१%, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना २१%, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १२%, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ९% मतदारांची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे गट-भाजपमध्ये सर्वाधिक पसंतीचा मुख्यमंत्री यावरून धुसफूस होणार का?

या सर्व्हेमध्ये राज्यात पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलणार, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या १७ ते १९ जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज आहे. तर शिंदे गटाच्या शिवसेनेला २५, राष्ट्रावादी काँग्रेसला ५५-५६ जागा, काँग्रेसला ५०-५३ आणि इतर पक्षांना १२ जागा मिळतील असा अंदाज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version