मुंबई : नागपूर सत्र न्यायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावला आहे. २०१४ साली निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी फडणवीसांना हा समन्स बजावण्यात आला आहे.
४ नोव्हेंबरला न्यायालयाने हा समन्स बजावला होता. मात्र पोलिसांनी २९ नोव्हेंबरला हा समन्स बजावला आहे. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याचा आरोप फडणवीसांवर करण्यात आला आहे. निवडणुकीच्या शतथविधी पत्रात फडणवीसांनी त्यांच्यावर असणारे दोन गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आज हा समन्स बजावला असला तरी त्यांच्या टाईमिंगवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने २४ तासांत त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. यावेळी पाठिंबा देणारे अजित पवार यांनी माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.