मुंबई: नुकत्याच झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांना सविस्तर माहितीही दिली त्यांनी सांगितले की, तीन पक्ष एकत्रित येऊन सत्तास्थापनेचा मिनिमम प्रोग्राम तयार करत होते. हा सत्तास्थापनेचा कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवावे एवढाच मॅक्झिमम प्रोग्रॅम होता. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रोग्रॅम हे तयार करू शकले नाहीत. कुठलाही निर्णय घेऊ शकले नाही. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर केली. पुढे ते म्हणाले की, दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये किती काळ राष्ट्रपति शासन राहील अशी परिस्थिती असताना अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते होते यांनी आम्हाला सहकार्य करायचं ठरवलं. त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेच्या अनुरूप त्यांनी आम्हाला ते पत्र दिलं या आधारावर आम्ही सरकार स्थापन केलं. कोर्टात उद्या बहुमत सादर करायचे आहे.जेव्हा सरकार स्थापित करायचं त्यावेळी अजितदादा पवार यांनी मला भेटून सांगितलं, काही कारणाने मी आपल्या सोबत येऊ शकत नाही त्यामुळे मी राजीनामा देतो आणि त्यांनी त्यांचा राजीनामा मला सुपूर्द केला. त्यांचा राजीनाम्यामुळे आता या ठिकाणी आमच्या जवळ देखील काही उरलेलं नाही. भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवशीपासून भूमिका घेतली होती आम्ही कोणाचे आमदार तोडणार नाही आम्ही कुठलंही घोडेबाजार करणार नाही. अजित पवार आमच्या सोबत आल्यामुळे सत्ता स्थापना केली होती आणि त्यावेळेस त्यांनी अलीकडेच राजीनामा दिला त्यामुळे आम्हीसुद्धा निर्णय घेतला की कुठलाही घोडेबाजार न करता आम्ही राजीनामा देऊ. म्हणून ही पत्रकार परिषद संपल्यानंतर मी राज्यपालांकडे जाणार आहे आणि माझा राजीनामा सुपर होणार आहे.
पुढे ते म्हणाले की पुढे सत्ता स्थापन करणाऱ्याना माझ्या शुभेच्छा आहे. मला विश्वास आहे चांगलं सरकार चालवण्याचा प्रयत्न ते करतील. भारतीय जनता पार्टी अत्यंत प्रभावी विरोधी पक्षाचं काम करेल. जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोचवून सोडवण्याचा प्रयत्न करेल. जनतेचा आवाज बनून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करू.