डीजीसीएने एअर एशियाला ठोठावला २० लाखांचा दंड!

नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी २०२३ :डीजीसीएने एअर एशियाला २० लाखांचा दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

नागरी उड्डाण आवश्यकतांचे उल्लंघन केल्याबद्दल DGCA ने ही कारवाई केली आहे. प्रशिक्षणादरम्यान एअर एशियाच्या वैमानिकांनी डीजीसीएच्या नियमांचे पालन केले नाही. तसेच आपली जबाबदारी ठीक पार न पडल्याने डीजीसीएने एअर एशियाच्या आठ तपासणी अधिकार्‍यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दुसरीकडे डीजीसीएकडून गेल्या काही दिवसांपासून कारवाई विमान कंपन्यांवर कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एअर इंडियातील विमान प्रवासादरम्यान महिला सहप्रवासाच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी डीजीसीएने मोठी कारवाई केली होती. नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा