धनंजय मुंडे यांचे परळीकरांना सतर्कतेचे आवाहन

परळी, दि. ६ जुलै २०२०: कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व कार्य चालू आहे. दरम्यान, परळी येथील स्टेट बँक मधील काही कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. बँकेतील काही कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समजताच, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिनांक ६ जुलै रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट मार्फत परळीकरांना सतर्कतेचे आवाहन दिले.

” प्रिय परळीकरांनो, स्टेट बँकेतील काही कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे कळले. घाबरण्याचे काही कारण नाही, मात्र दक्षता म्हणून आपण परळी शहरात पुढील ८ दिवस संपूर्ण संचारबंदी लागू करत आहोत. तसेच काही गावांमध्ये आवश्यकतेनुसार कंटेंटमेंट झोन लागू करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसींग चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आपण राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले असल्यास, किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आल्यास त्याची माहिती स्वत:हून प्रशासनास द्या, तपासणी करून घ्या. कोरोना विरोधात लढून आपल्याला ही साखळी तोडायची आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा. मी सातत्याने यंत्रणेच्या संपर्कात आहे. घाबरून जायचे काहीही कारण नाही. सर्वांनी काळजी घ्या, सतर्क रहा. ”

अशा प्रकारचा संदेश आज दिनांक ६ जुलै रोजी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंट मार्फत परळीकरांना देऊन त्यांना आधार दिला. तसेच,त्यांना प्रशासनाला कोरोना विरूद्ध लढ्यात सहकार्य करण्याचे आवाहन देखील दिले.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा