बीड, दि.११ मे २०२० : जागतिक मातृ दिनानिमित्ताने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आईसोबतचा विशेष सेल्फी शेअर करत आईच्याच चरणी वैकुंठ व आईच आपला पांडुरंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मातृदिनाच्या शुभेच्छांसह धनंजय मुंडे यांनी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या, आपल्या कर्तृत्वाने मातृत्वाची ढाल समाजासाठी निर्माण करणाऱ्या प्रत्येक मातेला वंदन केले आहे. आज १० मे जागतिक मातृ दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘मला आईचा मास्कसह अन्य विषयी सतत धाक असतो, मी खबरदारी घेतोच, परंतु माझी आई सातत्याने कटाक्षाने लक्ष ठेऊन असते की तिचा मुलगा बाहेर पडताना मास्क लावतोय का;’ असे म्हणतच मुंडेंनी आईसाठी मुलं सतत लहानच असतात असेही आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोनाने पसरलेल्या दहशतीखाली गेली दोन दिवस धनंजय मुंडे यांनी आईच्याच चरणी आपलं वैकुंठ असून आईच आपला पांडुरंग असल्याचे अत्यंत प्रेरक वक्तव्य ट्विटच्या माध्यमातून केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: