गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे धनकवडीतील ‘तीन हत्ती चौक’ समस्यांच्या गर्तेत; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी

धनकवडीतील ‘तीन हत्ती चौक’ समस्यांच्या गर्तेत; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी

धनकवडीतील प्रसिद्ध ‘क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले (तीन हत्ती) चौक’ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. एकेकाळी आकर्षण असलेले कारंजे बंद पडले असून, त्यात साचलेल्या पाण्यात लहान मुले धोकादायकपणे खेळताना दिसतात.

समस्यांची यादी इथेच संपत नाही. वाहतूक बेटांवर गवत आणि झुडपे वाढली आहेत, बेकायदेशीर पार्किंगने चौकाचा ताबा घेतला आहे, तर फ्लेक्सबाजीमुळे चौकाचे विद्रूपीकरण झाले आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची मागणी आहे की, चौकाचे मूळ सौंदर्य जपावे आणि ‘क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले’ या नावाला साजेसा दर्जा मिळावा.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version