गोल पोस्ट गुन्हा पुण्यात यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; सह्याद्री हॉस्पिटलवर हलगर्जीपणाचा आरोप

पुण्यात यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; सह्याद्री हॉस्पिटलवर हलगर्जीपणाचा आरोप

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झालेल्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बापू बाळकृष्ण कोमकर (५४) यांच्यासाठी पत्नी कामिनी बापू कोमकर (४८) यांनी स्वतःचे यकृत दान केले होते.

शस्त्रक्रिया १३ ऑगस्ट रोजी झाली होती. मात्र, केवळ दोन दिवसांत म्हणजे १५ ऑगस्टला बापू कोमकर यांचे निधन झाले, तर २२ ऑगस्ट रोजी कामिनी कोमकर यांचाही मृत्यू झाला.

नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर उपचारातील हलगर्जीपणाचा आरोप केला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून, सर्व धोके आधीच कुटुंबाला सांगितले होते. मात्र, रुग्णांना आलेला ‘शॉक’ आणि ‘मल्टी ऑर्गन डिसफंक्शन’ यामुळे त्यांना वाचवता आले नाही.”

या दुर्दैवी घटनेची चौकशी सध्या सुरू असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version