गोल पोस्ट महाराष्ट्र भारतीय कृषी विमा कंपनीला धाराशिव जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी २९४ कोटी...

भारतीय कृषी विमा कंपनीला धाराशिव जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी २९४ कोटी रक्कम वसुलीची नोटीस

धारशिव ३ डिसेंबर २०२३ : भारतीय कृषी विमा कंपनीला धाराशिव जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी २९४ कोटी रक्कम वसुलीची नोटीस पाठवली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२२ चा पीक विमा नुकसान भरपाई न मिळाल्याचे प्रकरणी ही नोटीस दिली असुन १० डिसेंबर पर्यंत विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम न भरल्यास महसूली वसुलीची कारवाई केली जाईल. विमा कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करुन लिलाव केला जाईल.

या कंपनीचे बँक खाते सील केले जाणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनी ही केंद्र सरकारच्या मालकीची आहे हे विशेष. ६ लाख ६८ हजार ८५३ शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर, उडीद व मूग आदी पिकांचा पीक विमा भरला होता. ३ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने ५० % रक्कम देत विमा मंजुर केला तर १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचा विमा नाकारला होता.शेतकरी तक्रारदार अनिल जगताप यांनी राज्य तक्रार समितीकडे याचिका दाखल करीत तक्रार केली होती त्यानंतर सुनावणी झाली आणि २९४ कोटी देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले गेले.

न्युज अनकट प्रतिनीधी : रहिम शेख

शून्य प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

error: Content is protected !!
Exit mobile version