गोल पोस्ट महाराष्ट्र धारावीत दोघा लाचखोर पोलिसांसह तिघांना अटक

धारावीत दोघा लाचखोर पोलिसांसह तिघांना अटक

मुंबई : बिर्याणीच्या हातगाडीवर कारवाई न करण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या धारावी पोलीस ठाण्यातील दोघा पोलिसांसह एका खासगी तरुणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली, तर आणखी एक पोलीस कॉन्स्टेबल फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक संजय अंकुश तळेकर, कॉन्स्टेबल मुकुंद गजानन शिंदे आणि प्रतिक जितेंद्र मेहेर अशी अटक केलेल्यांची नावे आहे.
पोलीस नाईक संदीप गणेश राणे हे फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिघे पोलीस हे धारावी पोलीस ठाण्यात ‘मिल स्पेशल’ म्हणून काम करतात. त्यांच्या वतीने प्रतीक मेहेर हा ‘कलेक्शन’चे काम करतो.

error: Content is protected !!
Exit mobile version