नवी दिल्ली: भारतीय सलामीवीर शिखर धवन याला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर करण्यात आले आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या मॅचदरम्यान सलामी फलंदाज शिखर धवनला दुखापत झाली आहे.
त्याच्याऐवजी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन हा विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत खेळणार आहे.
कोलकाता येथे झालेल्या भारतीय निवड समितीच्या बैठकीत वेस्ट इंडिज विरुद्ध टी-२० आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
सॅमसनने २०१४ झिम्बाब्वे दौऱ्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या दौर्यावर त्याने एक टी-२० सामना खेळला होता. त्यांनतर त्याला वगळण्यात आले होते.