त्रिपाठीच्या ७४ धावांपुढे धवनची ९९ धावांची खेळी व्यर्थ; हैदराबादचा पंजाबवर ८ विकेट्सने मोठा विजय

हैदराबाद, १० एप्रिल २०२३: सनरायजर्स हैद्राबादचे होम ग्राउंड असलेल्या राजीव गांधी स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना रंगला होता. सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा आठ गडी राखून पराभव करत मोठा विजय मिळवला. हैदराबादचा कर्णधार एडन मार्कराम ने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्ण घेतला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या नाबाद ९९ धावांच्या जोरावर पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर १४४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात सनरायझर्स संघाने राहुल त्रिपाठीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर १७.१ षटकात २ बाद १४५ धावा करत सामना जिंकला.

हैदराबादसमोरचे लक्ष्य फार मोठे नव्हते. हैद्राबाद समोर विजयासाठी १४८ धावांच आव्हान असताना हैद्राबाद संघाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या ओव्हरमध्ये पंजाबच्या अर्शदीपने हॅरी ब्रुकची विकेट घेतली. परंतु त्यानंतर हैद्राबादच्या फलंदाजांनी जोर पकडला. हैद्राबादकडून हरी ब्रुकने १३, मयांक अग्रवालने २१, राहुल त्रिपाठीने ७४ तर एडन मार्करमने ३७ धावा केल्या. मात्र, मयंक अग्रवालने (२१) काही चांगले फटके मारले पण नवव्या षटकापर्यंत संघाने ४५ धावांत दोन्ही विकेट गमावल्या होत्या. पंजाबला येथून पुनरागमन करण्याची संधी होती पण राहुल आणि कर्णधार मार्करामने ते होऊ दिले नाही.

सनरायझर्स हैदराबादला पहिल्या दोन सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागला. हैदराबादने रविवारी घरच्या मैदानावर दोन्ही आघाड्यांवर जोरदार पुनरागमन केले. युवा फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडेयने हैदराबादकडून पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट घेत दमदार सुरुवात केली. मार्को जानसेन आणि उमरान मलिक या दोघांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार याने २ विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली. मात्र, राहुल त्रिपाठीच्या उत्कृष्ट खेळीने फिनिशिंग टच लागू करून विजयाची इच्छा पूर्ण केली.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन एडन मार्कराम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक आणि टी नटराजन.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम कुरन, नॅथन एलिस, मोहित राठी, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा