वाघ्या मुरळी संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी धोंडीराम कारंडे

इंदापूर,६ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी धोंडीराम आप्पासाहेब कारंडे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.

नुकतेच पिटकेश्वर (ता. इंदापूर) येथील महादेव मंदिरामध्ये वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील वाघ्या मुरळी यांच्या सध्या संसर्गजन्य कोरनाच्या भयानक परिस्थितीत सर्व धार्मिक कार्यक्रम सध्या बंद आहेत. त्यामुळे जागरण गोंधळ करणारे वाघे मंडळ पर्टींना सध्या मोठ्या प्रमाणावर अडचणीचा काळ सुरू आहे. या विषयावर विचार मंथन यावेळी करण्यात आला. या अॉनलाईन बैठकीनंतर धोंडीराम आप्पासाहेब कारंडे यांची वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे प्राध्यापक मार्तंड साठे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी बैठकीचे उपाध्यक्ष पदी सोमनाथ कुसळकर हे होते.

यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्षा छबुताई वाघापुरे, कुमार साठे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष अनिल वाघापूर, सचिव वसंत कारंडे, साहेबराव कारंडे आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी नुतन अध्यक्ष धोंडीराम कारंडे म्हणाले की, वाघ्या मुरळी यांचे इंदापूर तालुक्यात अनेक प्रश्न आहेत. सध्या कोरोना भीषण परिस्थितीमध्ये कार्यक्रम नसल्याने उपासमारीची स्थिती निर्माण झाली असल्याने त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडणार असल्याचे या वेळी कारंडे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा